प्रति,
सर्व आहरण व संवितरण अधिकारी,
धुळे/साक्री/शिरपुर/शिंदखेडा
विषय :- नवनियुक्त् कर्मचाऱ्यांचे नविन पेन्श्न योजना (NPS) बाबत PFRDA यांचेकडुन आयोजित
प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहणेबाबत…
उपरोकत संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की , राष्ट्रीय निवृत्तीवेनत योजना अंतर्गत PFRDA यांचेकडुन आहरण व संवितरण अधिकारी यांचेकरीता विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येत आहेत. सदर प्रशिक्षण वर्ग दि. 22/08/2017 रोजी सकाळी 10:00 ते 01:00 व दुपारी 02:00 ते 05:00 या वेळेत होणार आहे तरी खाली नमुद केल्याप्रमाणे आपले कार्यालयास दिलेल्या वेळेत आहरण व संवितरण अधिकारी स्वत: तसेच आपल्या कार्यालयातील लेखा शाखेचा कर्मचारी यांनी उपस्थित रहावे.
सकाळ सत्र (10 ते 1) | धुळे जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी |
दुपार सत्र ( 2 ते 5) | साक्री,शिरपुर,शिंदखेडा तालुक्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी |
प्रशिक्षण कार्यक्रमाचे ठिकाण :- नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय